मुंबई : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ३ ते १० नोव्हेंबर असा ७ दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा राहणार आहे. या दरम्यान राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून आगमन झाले.
उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजे वांगचुक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.