धापेवाड्यात भाजपला धक्का; केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या गावात काँग्रेसचा विजय
06-Nov-2023
Total Views |
नागपूर : आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचे मुळगाव असलेल्या धापेवाडामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. या गावात 17 सदस्यांपैकी 10 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे, तर 6 सदस्य हे भाजपचे आहेत. याशिवाय 1 अपक्ष सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे धापेवाड्यात सरपंच पदाचा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला असून बाबासाहेब कोढे हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत.