Nagpur : बर्डी मार्केटमधील एका दुकानात अग्नितांडव!

    05-Nov-2023
Total Views |

Fire in Buldi Market
 
 
नागपूर :
नागपुरातील प्रसिद्ध बर्डी मार्केटमध्ये (Burdi Market) रविवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एका दुकानात लागल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे. अग्निशमन दलाच्या ५ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बर्डी मार्केट येथील संगत पंगत दुकानाला आज दुपारी आग लागली. आग लागल्यातच मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे आज रविवार असल्यामुळे बर्डी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या घटनेने कितपत नुकसान झाले याची माहिती अद्याप समजू शकले नाही. तसेच ही आग कशामुळे लागली याचीही माहिती अजून समोर आलेली नाही.