नागपूर :
खासदार सांस्कृतिक महोत्सव (khasdar sanskrutik mahotsav) समितीच्यावतीने ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव -2023’ चे यंदा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. ईश्वर देशमुख कॉलेज मैदान, क्रीडा चौक, नागपूर येथे होणाऱ्या या महोत्सवाच्या स्थळाचा भूमिपूजन समारंभ आज, रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. शहराध्यक्ष बंटी कुकडे, ग्रामीण शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या शुभहस्ते व सर्व मा. आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, विकास कुंभारे, तसेच सर्व आजी-माजी आमदार व खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आता केवळ मध्य भारतापुरताचा मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण देशात चर्चिला जात आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी उत्सूक आहेत. 2017 साली सुरू झालेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. यावर्षीच्या सांस्कृतिक महोत्सवात देखील नागपूरकरांना दर्जेदार कार्यक्रमांचे मेजवानी मिळणार आहे.