- बिबटचा मुक्तसंचार ठरू शकतो धोकादायक
अमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या (व्हीएमव्ही) परिसरात वन्यप्राणी बिबटचा मुक्तसंचार पाहता येथील परिसरातील झाडेझुडुपे कापण्यात यावे आणि परिसर स्वच्छ करण्यात आला, यासंदर्भात वनविभागाने व्हीएमव्ही प्रशासनाला पत्र दिले आहे. याशिवाय वनविभागाकडून व्हीएमव्हीच्या परिसरात तब्बल 25 ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रानी दिली.
शंभर एकरापेक्षा मोठा परिसर असणार्या व्हीएमव्ही परिसरात विविध विभागासह शासकीय वसाहतीत आहेत. यामध्ये अनेक क्वॉर्टर हे जिर्ण अवस्थेत असून, बहुंताश परिसरात मोठ-मोठी झाडेझुडुपे आहेत. अशा स्थितीत वन्य प्राणी बिबटचा मुक्तसंचार बिबट हा झाडाझुडुपाआड लपून बसत आहे. त्यामुळे ही बाब नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. बिबटच्या मुक्तसंचारामुळे वनविभागाचा चमू या ठिकाणी तळ ठोकून आले. परंतू झाडाझुडुपांमुळे बिबट दृष्टीस पडत नसावा, अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यासंदर्भात वनविभागाच्या कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली असून, यासंदर्भात व्हीएमव्ही प्रशासनाला झाडेझुडुपे काढण्यासंदर्भात पत्र देण्याचे ठरविण्यात आले आहे.
व्हीएमव्ही परिसर मोठा असून, येथील परिसर झाडाझुडुपांनी वेढलेला आहे. येथे बिबटचा वावर असल्यामुळे तो या झाडाझुडुपांमध्ये लपून बसू शकतो. त्यामुळे येथील झाडेझुडुपे काढण्यासंदर्भात व्हीएमव्ही प्रशासनाला पत्र देण्यात येईल. तसेच या परिसरात 25 ते 26 कॅमेरे लावण्यात येणार आहे.
प्रभाकर वानखडे, आरएफओ, रेस्क्यू पथक, वनविभाग.