पंतप्रधान आवास योजनेकडे मनपाचे दुर्लक्ष - तुषार भारतीय

    03-Nov-2023
Total Views |
 
prime-ministers-housing-scheme-faces-criticism - Abhijeet Bharat
 
अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘सर्वांसाठी घरे’ हा आहे. या अंतर्गत पंतप्रधान आवास योजना अमरावती मनपा अंतर्गत. सुरू असलेली कामे रखडली असून. कंत्राटदार आणि मनपा प्रशासन यांचा समन्वय नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहे. असा आरोप माजी नगरसेवक तथा भाजप नेते तुषार भारतीय यांनी केला आहे.
 
भारतीय यांनी सांगितले की, वर्ष 2018 पासून प्रत्येकी 50 हजार रुपये भरले आहे. अनेक कुटुंबाने कर्ज काढून, सोने, चांदी गहाण ठेऊन 50 हजाराचा मनपा प्रशासन नागरिकांना उडवाउडवीची उत्तर देत आहे. मनपा प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या चूकीमुळे शेकडो कुटुंब भाड्याचे घरात राहून आर्थिक नुकसान सहन करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनेला अपयशी करण्याचे काम प्रशासन व कंत्राटदार यांच्याकडून होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुषार भारतीय यांनी आयुक्त आणि कंत्राटदार यांची बैठक घेऊन याबाबत विचारणा केली. यावेळी अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंत्राटदार यांच्या कामाची प्रगती बघता. पुढील 50 वर्ष काम पूर्ण होणार नाही, असा आरोपही भारतीय यांनी केला. कासव गतीने सुरू असलेल्या कामाला गती नाही दिल्यास या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचेकडून काम काढून घ्यावे.
 
उच्च स्तरावर तक्रार
 
या बाबत पीएमओ ऑफिस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे करणार आहे. लवकरच पालकमंत्रीसोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लागेल असे प्रतिपादन भाजपा नेते तुषार भारतीय यांनी केले आहे. या बैठकीला मनपा आयुक्त देविदास पवार, शहर अभियंता इकबाल खान, माजी महापौर चेतन गावंडे, प्रणित सोनी, कंत्राटदार शेखर मुळे, मिलिंद चव्हाण, आवास योजनेचे चौधरी व नागरिक उपस्थित होते.