मागासवर्गीयांच्या चळवळीला दादासाहेबांनी दिशा दिली-अभ्यंकर

    03-Nov-2023
Total Views |
  • रा.सू.उपाख्य दादासाहेब गवई यांची जयंती साजरी
  • भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेचे आयोजन
daadasaheb-gawai-tribute-amaravati - Abhijeet Bharat
 
अमरावती : नागपूर येथील दिक्षाभूमीचे शिल्पकार तथा रिपब्लीकन पार्टीचे माजी अध्यक्ष रा. सू.उपाख्य दादासाहेब गवई यांनी आयुष्यभर बाबासाहेबांची चळवळ प्रामाणिकपणे राबवून सर्व मागासवर्गियांचे रक्षण करून चळवळीला योग्य दिशा दाखवली. असे प्रतिपादन राहुल व्यायाय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष समाज भूषण मधुकरराव अभ्यंकर यांनी केले. ते येथील गोपाल नगर स्थित भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेत दादासाहेब गवई यांच्या जयंती निमित्य बोलत होते.
 
कार्यक्रमाच्या सुरवातीला दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पाहूण्यांच्या हस्ते पुजन करून हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणुन अमरावती शहरातील सुप्रसिध्द इंजिनिअर रोहीत लेंडे दादासाहेबांना अभिवादन करतांना म्हणाले की, दादासाहेब गवई यांनी आयुष्यभर सर्व जाती धर्माचा आदर करून सन्मान केला. त्यांनी कधीच कोणताही भेदभाव न करता त्यांच्याकडे येणा:या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस क्षितीज अभ्यंकर, प्राचार्य गजानन वानखडे, सतिश पुंडकर यांनीही या प्रसंगी विचार व्यक्त करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाल अभ्यंकर तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन रोहीणी ठोबरे यांनी केले. कार्यकमाला प्रमुख्याने मंगला वंजारी, जीवन फसाटे, गोरखनाथ पर्वतकर, अमोल वानखडे, मनोज शिरभाते, गजानन भोंगरे, बाळाभाऊ अवघड, कविता दुधे, मंगला बोबडे, मुकुदं चौधरी, कुंदा खेडकर, सरिता हरणे, निलीमा गोरले, प्रमोद भगत, संतोष राठोड, विजया सोनोने, निर्मला राऊत, सिमता मोरे दिपाली आवडकर, वैशाली सदावर्ते इत्यादी हजर होते.