आरक्षणाच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

    03-Nov-2023
Total Views |
  • छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखळी उपोषण
chandur-railway-protests-for-maratha-reservations - Abhijeet Bharat
 
चांदूर रेल्वे : मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी चांदूर रेल्वे सकल मराठा समाज स्थानिक शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मंगळवारपासून साखळी उपोषण छेडले आहे. या उपोषणस्थळी बुधवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
 
मंगळवारी पहिल्या दिवशी बंडू यादव व गजानन यादव शहरातील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषणला बसले होते. तर बुधवारी दुसऱ्या दिवशी निशिकांत देशमुख, संदीप जरे, संकेत यादव हे उपोषणाला बसले. साखळी उपोषण मराठा आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाने सांगितले. यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिरभाते, शहराध्यक्ष दिनेश आमले, राजु वऱ्हाडे, अवधुत भस्मे, मंदार शिरभाते, साहेबराव ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. याठिकाणी त्यांनी उपोषणकर्त्यांना व उपस्थित मराठा समाजबांधवांना आपल्या पाठिंब्याचे पत्र दिले. यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला चांदूर रेल्वे शहरातूनसुध्दा वाढता प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.