- अमरावती डिस्ट्रीक परमिट रुम असोशिएशनचे जिल्हाधिकारी, सीपींना निवेदन
अमरावती : राज्य शासनाने 10 टक्के वॅट लावल्याच्या निषेधार्थ 2 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व बार बंद ठेवण्याचा निर्णय अमरावती डिस्ट्रीक परमिट रुम असोशिएशनने घेतला आहे. वॅट विरोधात असोशिएशनतर्फे निषेध नोंदविण्यात आला असून, यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांना बुधवार, 1 ऑक्टोंबर रोजी सोपविले.
निवेदनानुसार, महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबरपासून एफ एल (3) म्हणजे केवळ बार चालकांवर पाच टक्के ऐवजी दहा टक्के वॅट आकारण्याची अधिसूचना काढली आहे. हा निर्णय संपूर्ण अन्याय असून केवळ वाईन शॉप वाल्यांच्या हिताचा किंवा त्यांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आहे. यामुळे राज्यातील वीस हजार बारचालक संकटात येणार आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असणारे वेटर, मॅनेजर, स्वच्छता कामगार, विविध प्रकारचे सप्लायर्स अशा लाखोंच्या नोकरीवर व व्यवसायावर गदा येणार आहे. याचा निषेध म्हणुन अमरावती जिल्हयातील सर्व वार 2 ऑक्टोंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने केवळ एफएल 3 वर वॅट लावणे व इतरांना कुठलाही टॅक्स न लावणे हे चुकीचे व अत्यंत अन्याय पूर्ण आहे. यामुळे अनधिकृत दारू विकल्या जाईल, तसेच 80 टक्के बार चालकांवर वाईन शॉप वरून दारू घेण्याची किंवा अन्य राज्यातून दारू आणण्याशिवाय पर्याय राहणार नाही. या विरुद्ध असंतोष होईल. त्यामुळे सर्व बार चालकांना एकतर बार बंद करावे लागतील किंवा टोकाचे पाऊल उचलावे लागेल. तरी वॅट पूर्णपणे रद्द करण्याची किंवा मदय कारखान्यातून निघते वेळेस व्हॅट वसूल करण्याची ( जेणेकरून सर्वांना समान टॅक्स दयावा लागेल) मागणी मान्य करावी. अशी मागणी अमरावती डिस्ट्रीक परमिट रुम असोशिएशनने केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष, नितीन मोहोड, उपाध्यक्ष सूर्यकांत जैयस्वाल, शहर अध्यक्ष गजानन राजगुरे, सचिव आशिष देशमुख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.