- खा. शरद पवार यांच्या नागपूर येथील सभेचा घेणार आढावा
नागपूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. या संघर्ष यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला राष्ट्रीवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे २८ नोव्हेंबर पासून विदर्भाचा दौरा करणार आहे.
मंगळवारला सकाळी ११ वाजता वाशिम जिल्हातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून नंतर पत्रकारासोबत ते संवाद साधरणार आहेत. यानंतर त्याच दिवशी अकोला येथे जाऊन दुपारी ४ वाजता मातोश्री सभागृह, शिवापूर फाटा, खडकी, अकोला येथे अकोला शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार असून नंतर पत्रकारासोबत संवाद साधून अमवरातीकडे प्रयाण करतील.
२९ नोव्हेंबर बुधवारला सकाळी ११ वाजता अमवराती येथील सेलीब्रेशन हॉल, व्हराडे मंगल, कार्यालय येथे अमरावती शहर व ग्रामिणच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. नंतर पत्रकार परिषद घेऊन यवतमाळकडे प्रयाण करतील. यवतमाळ येथे सायंकाळी ४ वाजता टिळक स्मारक येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून नंतर पत्रकारांसोबत संवाद साधून वर्धा येथे मुक्कामी जातील.
३० नोव्हेंबर गुरुवारला सकाळी ११ वाजता वर्धा येथे पत्रकारासोबत संवाद साधल्यानंतर ११.३० वाजता शिवभैवन मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून नंतर ते चंद्रपूरकडे मुक्कामासाठी रवाना होतील. १ डिसेंबर शुक्रवारला सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर व जिल्हातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून नंतर पत्रकारासोबत संवाद साधतील. यानंतर ते गडचीरोली येथे जावून दुपारी ३ वाजता पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील.