- संविधान दिनानिमीत्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि संविधान ग्रंथाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते वाटप
मुंबई : महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. भारतात जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही प्रणाली यशस्वीपणे नांदत आहे. जगातल्या सर्वात मोठया संसदीय लोकशाहीचा डोलारा भारतात मजबूत उभा आहे. त्याचा मुळ आधारस्तंभ भारतीय संविधान आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
संविधान दिनानिमीत्त आज चैत्यभुमी येथे संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी चैत्यभुमी स्तुपात महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी संविधान दिनानिमीत्त विनम्र अभिवादन केले. यावेळी रिपब्लिपन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे नागसेन कांबळे, रवि गरुड, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, साधू कटके; घनश्याम चिरणकर, युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते; सोना कांबळे; रवी गायकवाड; शिरीष चिखलकर; आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

संविधान दिनाचे औचित्य साधुन आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनेकांना संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असणारा संविधानातील भारत साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार काम करीत आहे. काँग्रेससारखे विरोधी पक्ष संविधान बदलले जाईल असा खोडसाळ आणि खोटा प्रचार करीत आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताचे संविधान बदलु शकत नाही. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेले संविधान हे परिपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानाला कोणी हात लावु शकत नाही. कोणतेही सरकार असो सरकार बदलले जाते आणि संविधान बदलणार अस म्हणणारे लोकही बदलले जातील. परंतु संविधान कधीही बदलणार नाही.
संविधानाच्या संरक्षणासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये आहे. प्रधानमंत्री मोदी हे संविधान रक्षक आहेत. संविधान पुजक आहेत. त्यामुळे विरोधकांनी चालवलेला संविधान बदलण्याचा खोटा प्रचार बंद करावा. त्यामुळे देशात कधीही महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलले जाणार नाही. सरकार बदलले जाईल पंरतु संविधान कधीही बदलले जाणार नाही असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.