Nagpur : २४० विद्यार्थ्यांनी सादर केला ३५० वा 'शिवराज्याभिषेक सोहळा'

    26-Nov-2023
Total Views |
 
modern-school-cultural-event-november -  Abhijeet Bharat
 
नागपूर : मॉडर्न स्कूलचा द्विवार्षिक सांस्कृतिक सोहळा शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेच्या संचालिका नीरु कपाई कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या तर विशेष अतिथी म्हणून 'गढ-संवर्धन' समितीचे सदस्य व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पूर्वावलोकन कमिटीचे सल्लागार श्री अतुल गुरु होते. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने झाला व कार्यक्रमाची सुरुवात 'टोरींसच्या' सदाबहार सादरीकरणाने व तत्पश्चात भक्तिभावाने ओतप्रोत 'गणेश वंदना' सादर करून झाली. विविध प्रकारचे 'लोक नृत्य', करगम नृत्य, वेस्टर्न नृत्य तसेच शास्त्रीय गीत, लोकगीत, बालगीत हे सर्व गीत प्रकार आणि बहारदार तबला वादनाने संपूर्ण प्रेक्षागार भारावून टाकणारे सादरीकरण झाले.
  
कार्यक्रमाचे आकर्षण 'शिवराज्याभिषेक सोहळा' तो प्रस्तुत केला वर्ग ४ आणि ५ च्या विद्यार्थ्यांनी, हातात स्वराज्याचा भगवा घेऊन आपल्या लाडक्या 'शिवबाच्या' राज्याभिषेकासाठी दंग होऊन सादरीकरण केले व या ऐतिहासिक सादरीकरणानंतर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
मॉडर्न स्कूलच्या संचालिका नीरू कपाई, कोषाध्यक्ष कमल कपाई, प्राचार्या रुपाली डे, प्राचार्य नीरी मॉडर्न स्कूल उदय ठोसर, व्यवस्थापक रोहन कपाई, मुख्याध्यापिका आशा देशराज, जिंगलबेल किंडरगार्टनच्या कार्यकारिणी सदस्या रितू कपई व समन्वयक मंजिरी जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
 
कार्यक्रमाचे संयोजक रवी सातफळे, श्रीकांत पिसे आणि रितिका दलाल होते तर नितीन गाडगीळ, सुप्ता दत्ता, दीप्ती काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशा देशराज यांनी तर सूत्र-संचालन सबा खान व संगीता श्रीवास यांनी केले.