‘लोकमानसातील च‍ित्रवैभव’ 27 नोव्‍हेंबर रोजी

    26-Nov-2023
Total Views |
  • तीन कलाकारांच्‍या कलाकृतींवर तीन व्‍याख्‍याने
lokmanasachi-chitravaibhav-27-november - Abhijeet Bharat 
नागपूर : विदर्भ साहित्‍य संघाच्‍या ‘सर्जना निर्माण’ या मालिकेचे दुसरे सत्र आणि तिसरे पुष्‍प ‘लोकमानसातील चित्रवैभव’ सोमवार, 27 नोव्‍हेंबर 2023 रोजी आयोज‍ित करण्‍यात आले आहे. अमेय दालन, चौथा माळा, विदर्भ साहित्‍य संघ, झाशी राणी चौक येथे सायंकाळी 6.15 वाजता होणार आहे. तीन लोकचित्रकारांच्‍या तीन कलाकृतींवर तीन कलाकार व्‍याख्‍यान देणार आहेत. यात वारली लोकचित्रांवर प्रा. सदानंद चौधरी भाष्‍य करणार असून कालीघाटा लोकचित्रांवर प्रा. विनोद चव्‍हाण आपले मत मांडतील. मधुबनी लोकचित्रांवर प्रा. चंद्रकात चन्‍ने भाष्‍य करणार आहेत. मंगेश बावसे संवादक आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.