- ‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा
(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या पार्श्वभूमीवर येत्या 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता जोग सेंटर, तात्या टोपे नगर येथे बांबू क्षेत्रातील प्रमुख सदस्यांची बैठक आयोजित कारणात आली आहे. बांबू क्षेत्रातील संधी आणि आव्हाने यावर या बैठकीत विचारमंथन होणार आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ विदर्भ (एआयडी) तर्फे जानेवारी 2024 मध्ये नागपुरात 3 दिवसीय एक्स्पो आणि बिझनेस कॉन्क्लेव्ह आयोजित करत आहे आणि 48 इतर औद्योगिक क्लस्टर्समध्ये बांबू क्षेत्राची निवड करण्यात आली आहे.
ही बैठक विशेषतः बांबू क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व सदस्यांसाठी या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांची यादी तयार करण्यासाठी आयोजित करण्यात येत असून यात बांबू क्षेत्राची आर्थिक प्रगती आणि विस्तार सुनिश्चित करण्यासाठी सूचनांचा समावेश करण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेवर आधारित असलेले, 'अॅडव्हान्टेज विदर्भ' हे स्टॉल्स प्रदर्शित करण्यासाठी, उत्पादनक्षमतेसाठी तांत्रिक सत्रे आयोजित करण्यासाठी, गुणवत्ता वाढीसाठी, बांबू क्षेत्रातील नामवंत व्यक्तींमार्फत ज्ञानाच्या देवाण घेवाणीसाठी, व्यवसायाच्या संधी, विस्ताराच्या संधी इत्यादींसाठी एक उत्तम व्यासपीठ असेल. ज्ञानवृद्धी आणि बांबू क्षेत्राच्या प्रगतीसाठी या बैठकीला विशेष महत्त्व आहे. सुनील जोशी आणि एडचे सचिव डॉ विजय शर्मा आणि प्रदीप माहेश्वरी या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.