Khasdar Sanskrutik Mahotsav 2023 : ‘खासदार’च्‍या भव्‍य मंचावर उदयोन्‍मुख कलाकारांनाही म‍िळणार संधी

    23-Nov-2023
Total Views |
 
khasdar-sanskrutik-mahotsav-2023 - Abhijeet Bharat
 
नागपूर : खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्‍या पटांगणात सायंकाळच्‍या सत्रात सायंकाळी 6 वाजता मुख्‍य कार्यक्रमापूर्वी अर्धा तास नागपुरातील उदयोन्‍मुख कलाकारांसाठी राखीव ठेवण्‍यात आला असून हजारो प्रेक्षकांसमोर या कलाकारांना आपली कला सादर करण्‍याची संधी म‍िळणार आहे. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात यंदा सकाळ व संध्‍याकाळ अशा दोन सत्रात कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळच्‍या सत्रात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर नामांकित कलाकार आपली प्रस्‍तुती देणार असून या मुख्‍य कार्यक्रमाच्‍या आधी स्‍थानिक उदयोन्‍मुख कलाकारांच्‍या कलांचा नागपूरकरांना आनंद घेता येणार आहे.
 
रविवारी, 26 तारखेला सायंकाळी 6 वाजता विशाल शेळके यांचा बॉलिवूड गीतांचा कार्यक्रम होणार असून 27 तारखेला किशोर हम्‍पीहोळी यांची चमू ‘गंगा-यमुना’ हा नृत्‍याविष्‍कार सादर करतील. 28 तारखेला आयुष्‍य मानकर यांचा हिंदी-मराठी गाण्‍यांचा कार्यक्रम, 29 तारखेला श्रीकांत पिसे व चमूचे ‘फ्यूजन’, 30 तारखेला राधिक क्रियेशन्‍स प्रस्‍तुत नशामुक्‍तीवर आधारित पथनाट्य ‘मोहजाल’, 1 डिसेंबर रोजी आनंदी ग्रुप प्रस्‍तुत ‘राम रतन धन पायो’, 2 डिसेंबर रोजी परिणीता मातुरकर यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होईल. 3 तारखेला बालकला अकादमी ‘जयतु जयतु भारतम्’ नृत्‍यन‍ाटिका प्रस्‍तुत करेल तर 4 तारखेला श्‍याम देशपांडे यांची चमू देशभक्‍तीपर गीते सादर करतील. उद्योन्‍मुख कलाकारांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप देण्‍याकरिता नागपूरकर रसिकांनी मुख्‍य कार्यक्रमापूर्वी उपस्‍थ‍ित राहून कलावंतांचा कलेला प्रोत्‍साहन द्यावे, असे खासदार सांस्‍कृतिक सम‍ितीतर्फे आवाहन करण्‍यात आले आहे.