श्री गजानन महाराजांना 3000 क‍िलो खिचडीचा नैवद्य

    23-Nov-2023
Total Views |
  • खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवामध्‍ये 30 नोव्‍हेंबर रोजी भव्‍य आयोजन
gajanan-maharaj-cultural-festival-prasad - Abhijeet Bharat
 
नागपूर : खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवामध्‍ये ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्‍या पटांगणात गुरुवार, 30 नोव्‍हेंबर रोजी सकाळच्‍या सत्रात सकाळी 6.30 वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण होणार असून प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर महाराजांना 3000 किलो खिचडीचा महाप्रसाद तयार करणार आहेत. सुमारे 45 हजार गजानन भक्‍तांना या महाप्रसादाचा लाभ मिळणार असल्‍याचे खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीच्‍यावतीने कळविण्‍यात आले आहे.
 
‘अन्‍न हे पुर्णब्रम्‍ह’ असे श्री गजानन महाराज नेहमी म्‍हणायचे. त्‍यांच्‍या पोथीमध्‍ये खिचडीचा उल्‍लेख आढळतो. गजानन महाराजांच्‍या पारायणाला सकाळी 6.30 वाजता प्रारंभ होणार होईल. त्‍याचवेळी वेळी विष्‍णू मनोहर खिचडी तयार करायला सुरुवात करतील. त्‍यात, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंब‍िर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्‍याचा वापर करून ही 3000 किलो खिचडी तयार करणार आहेत. त्‍यासाठी 7 फूट व्‍यासाची, 4 फूट कढई वापरली जाणार आहे. ही तयार झालेली खिचडी प्रसाद म्‍हणून पारायणात सहभागी झालेले भक्‍तगण, तसेच, जनतेला वितरीत केली जाणार आहेत. सुमारे 45 हजार गजानन भक्‍तांना या महाप्रसादाचा लाभ होईल.