डॉ. मुकुंद ओक यांचे सुश्राव्य गायन 25 रोजी

    23-Nov-2023
Total Views |
 
dr-mukund-oak-sushravya-gayan-event - Abhijeet Bharat
 
नागपूर : सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध गायक डॉ. मुकुंद ओक यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अमेय दालन, सांस्‍कृतिक संकुल, चौथा मजला, विदर्भ साहित्‍य संघ, झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे हा कार्यक्रम होईल.
 
त्यांना तबल्यावर विरथ वाडेगावकर, तर हार्मोनियमवर शिरीष भालेराव हे साथ देणार आहेत. या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.