विकसित भारत संकल्प यात्रेचा कोल्हापुरातील प्रवास सुरू

    22-Nov-2023
Total Views |
  • वंचित पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी भारत संकल्प यात्रेचे आयोजन : हसन मुश्रीफ
vikasit-bharat-sankalp-yatra-maharashtra - Abhijeet Bharat
 
कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान नागरिकांनी भेट देऊन कोणत्या सरकारी योजना त्यांना लाभ मिळू शकतो, त्याची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
 
कोल्हापुरात या संकल्प यात्रेच्या 9 रथांचे स्वागत करताना ते बोलत होते. देशाला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत योजनाबद्ध काम चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जे पात्र लाभार्थी अजूनही योजनांपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे सहाय्य असो, सर्वांसाठी मोफत उपचार असो अथवा महिलांना धूरमुक्त जीवन देण्यासाठी उज्वला योजना असो किंवा 4 कोटी पक्की घरे असो, अशा सर्व कामांतून सरकारचे देशाला विकसित बनविण्‍यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते, असे मंत्री म्हणाले.
 
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अगोदर करण्यात आलेल्या ग्रामस्वराज्य अभियान यासारख्या उपक्रमांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. हा संकल्परथ जिल्ह्यातील सर्व 1025 ग्रामपंचायतींना भेट देईल.