नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पनौती म्हणून उल्लेख केल्याबद्दल सध्या राजकीय क्षेत्र चांगलेच तापले आहे. राहून गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपकडून पलटवार करण्यात येत आहे. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील राहुल यांना धारेवर धरले आहे. १९ नोव्हेंबर ही इंदिरा गांधी यांची जयंती होती, मग भारताने विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना जिंकायलाच पाहिजे होता. म्हणजे खरी पनौती कोण? असा सवाल करत नितेश राणेंनी राहून गांधींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी पनौती या शब्दावर मोठे वक्तव्य करण्याची हिम्मत केली आहे. आता १९ नोव्हेंबर ही कोणाची जयंती? प्रियांका गांधी यांच्याप्रमाणे १९ नोव्हेंबर ही इंदिरा गांधी यांची जयंती होती मग भारताने विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना जिंकायलाच पाहिजे होता. म्हणजे खरी पनौती कोण? गांधी कुटुंबियांच्यामुळे गेली ६०-७० वर्षे देशाला जी पनौती लागली, ती पनौती २०१४ मध्ये मोदी यांच्या नावाने दूर झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाचा पालक कसा असतो, हे खऱ्या अर्थाने त्यावेळी त्यांनी दाखवून दिलेले आहे. ते केवळ स्टेडियममध्ये उपस्थितच राहिले नाही, तर नंतर भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवले त्यांना धीर दिला याला खऱ्या अर्थाने फादर ऑफ द नेशन म्हणतात. राष्ट्रपिता म्हणतात, नेता म्हणतात. जो मूळ आपल्या देशाचा देखील नाही, जो अर्धा इटालियन आहे, ज्याची नागरिकांत कदाचित ब्रिटिशची असेल, त्या राहुल गांधींना देशप्रेम आणि भारतीयांवरील प्रेम कधीच कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी राहून गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी विश्वचषकाचा भारत विरुद्ध आस्ट्रेलिया अंतिम सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. तर भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. यावेळी हा सामना बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्टेडियमवर उपस्थित होते. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची पनौती म्हणून तुलना केली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर पलटवार करण्यात येत आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी देखील भाजपकडून होत आहे.
काय म्हणले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जालोरमध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'ते (मोदी) क्रिकेटच्या मॅचला जाणार, ती मॅच हरणार ही वेगळी गोष्ट आहे, पनौती! पंतप्रधान म्हणजे पनौती मोदी.' बरं, आपल्या मुलांनी तिथे वर्ल्ड कप जिंकला असता, पण तिथे पनौतीचा पराभव झाला, पण टीव्हीवाले हे म्हणणार नाहीत. जनतेला हे माहीत आहे.'