साधू वासवानी जयंती निमित्त शनिवारी कत्तलखाने व मांस विक्री बंद

    21-Nov-2023
Total Views |

Slaughterhouses
 
 
नागपूर :
साधू वासवानी जयंती (Sadhu Vaswani Jayanti) निमित्त शनिवार २५ नोव्हेंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
 
उपायुक्तांच्या आदेशानुसार, शनिवारी २५ नोव्हेंबरला साधू वासवानी जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.