नागपूर : सन एन्व्हायरो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात दिवाळी पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कंपनीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संगीत संध्या चांगलीच रंगली.
या कार्यक्रमात संचालक जगदीश लांजेवार व प्रांजली लांजेवार यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. संचालक जगदीश लांजेवार व उत्कर्ष खोपकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, समीक्षा शिंदे व मनीषा डाखोळे यांनी सुंदर रांगोळ्या घालून सर्वांना मंत्रमुग्ध केले तर हितेंद्र धारगावे यांनी बॅंजोवर आपल्या वाद्यकौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनिशा रोटीवार, क्रांती खोपकर, राहुल गुप्ते यांची गाणी आणि अभिजीत खापेकर यांची ऑफलाईन रेकॉर्डेड गाणी सादर करून रंगत आणली. विष्णू मराठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता निशांत चावजी, निकिता लोणारे यांचे सहकार्य लाभले.