Ind vs Aus World Cup 2023 Final : भारताच्या विजयासाठी नागपुरात अनेकांनी केली महाआरती

    19-Nov-2023
Total Views |
 
india-australia-world-cup-2023-nagpur-celebrations - Abhijeet Bharat
 
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup 2023) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारत आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले आहेत. वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी प्रार्थना आणि पूजा केली जात आहे. अशातच भारताने विश्वचषक अंतिम सामना जिंकण्यासाठी नागपुरात अनेकांनी महाआरती केली आहे.
 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी चाहते भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. लोकांमध्ये अप्रतिम उत्साह पाहायला मिळत आहे.
 
महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात सकाळपासून होमहवन आणि पूजेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. पूर्व नागपुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी टीम इंडियाचे चित्र आणि हातात तिरंगा घेऊन हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळी जयघोषाने परिसर दुमदुमला होता. याशिवाय शिवसेना कार्यकर्त्यांनी भारतीय संघाच्या विजयाच्या घोषणा दिल्या व त्यांच्या विधीला नक्कीच फळ मिळेल आणि संघाचा विजय रथ वाढतच जाईल, असा पूर्ण विश्वास व्यक्त केला.
 
ढोल ताशा पथकासह प्रार्थना
 
आज भारतीय संघ विश्वचषक फायनलसाठी खेळत असून त्याचा उत्साह वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नागपुरातील छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरात आणि झेंडा फडकवत जल्लोष करत भारतीय क्रिकेट संघटनेच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली.