Mumbai : ग्रँट रोड परिसरातील एका बहुमजली इमारतीला भीषण आग

    17-Nov-2023
Total Views |

fire broke out in a building near grant road area of mumbai
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई : 
मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील (Grant Road Area) एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून इमारतीच्या ११व्या आणि १२व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या आगीच्या घटनेमुळे सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
 
 
अग्निशमन दलाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ग्रँट रोड परिसरातील बहुमजली इमारतीला लागलेली आग ही लेव्हल २ ची आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही दुखापत जिमला जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आग इमारतीच्या ८व्या मजल्यावरील आणि १२व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, दरवाजे, घरगुती वस्तू इत्यादीपर्यंत मर्यादित होती. २१व्या आणि २२व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी टेरेसवर सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच १५व्या मजल्यावर अडकलेल्या ७-८ लोकांची देखील अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करत त्यांना जिन्याने टेरेसवर हलवले.