संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जकार्ता येथील 10 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला राहणार उपस्थित

    14-Nov-2023
Total Views |
  • सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका होणार
rajnath-singh-attends-asean-defense-ministers-meeting-jakarta - Abhijeet BHarat
 
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 16 ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीत इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 10 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत (एडीएमएम-प्लस) सहभागी होतील. 16 नोव्हेंबर रोजी या बैठकीत संरक्षण मंत्री प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवर या बैठकीला संबोधित करतील. एडीएमएम-प्लस चे अध्यक्षपद इंडोनेशिया कडे असल्यामुळे इंडोनेशिया या बैठकीचे आयोजन केले आहे. एडीएमएम-प्लसच्या सोबतच राजनाथ सिंह सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील आणि परस्पर-फायद्याच्या गुंतवणुकीला अधिक बळकट करण्यासाठी संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.
 
 
एडीएमएम ही आसियान मधील सर्वोच्च संरक्षण सल्लागार आणि सहकारी यंत्रणा आहे. एडीएमएम-प्लस हे आसियान सदस्य देश (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम) आणि त्याचे आठ संवाद भागीदार (भारत, अमेरिका, चीन, रशिया, जपान,दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड) या देशांचे सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठीचे व्यासपीठ आहे.
 
भारत 1992 मध्ये आसियानचा संवाद भागीदार बनला. 12 ऑक्टोबर 2010 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथे एडीएमएम-प्लस आयोजित करण्यात आले होते. 2017 पासून एडीएमएम-प्लस मंत्री आसियान आणि प्लस देश यांच्यातील सहकार्याला बळ देण्यासाठी सर्व देश दरवर्षी बैठक घेतात.
 
एडीएमएम-प्लस सात तज्ञ कार्यगट (इडब्लूजीएस)द्वारे सदस्य देशांमधील व्यावहारिक सहकार्याच्या प्रगती साठी कार्यरत आहे. सागरी सुरक्षा, लष्करी औषधे, सायबर सुरक्षा, शांतता रक्षण, दहशतवादविरोधी प्रयत्न, मानवतावादी खाण क्रुती आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएएडीआर) ही ती क्षेत्रे आहेत. 10 व्या एडीएमएम-प्लस दरम्यान 2024-2027 या कालावधीसाठी सह-अध्यक्षांचा पुढील संघ देखील घोषित केला जाईल. सध्याच्या 2021-2024 च्या कालावधीत भारत इंडोनेशियासह एचएएडीआर वर इडब्लूजी चा सह-अध्यक्ष आहे.