- भगवान बिरसा मुंडा यांचे यांच्या जन्मस्थानाला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरणार
- झारखंडमध्ये सुमारे 7200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार लोकार्पण आणि पायाभरणी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय झारखंड राज्याच्या दौऱ्यावर आहेत. 14 आणि 15 नोव्हेंबर असा त्यांचा हा २ दिवसांचा दौरा असणार आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 च्या सुमाराला पंतप्रधान रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाला भेट देतील. त्यानंतर ते भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू गावामध्ये दाखल होतील आणि तेथील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील.
या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू या गावाला भेट देणार आहेत. महत्वाचे म्हणजे या गावाला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असतील. खुंटी येथे सकाळी 11.30 च्या सुमाराला ते आदिवासी गौरव दिवस साजरा करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि ‘पंतप्रधान विशेषतः वंचित आदिवासी समूह मिशन’चा शुभारंभ करतील. पीएम-किसान अंतर्गत पंतप्रधान सुमारे 18,000 कोटी रुपयांचा 15वा हप्ता देखील जारी करतील आणि झारखंडमध्ये विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.