नागपूर : दिवाळीच्या चौथ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गोवर्धन पूजा केली जाते. तर काही ठिकाणी अन्नकूट पूजा केली जाते. भारतातील विभिन्नतेमुळे प्रत्येक सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. गोवर्धन पूजेला लोक शेणाचा वापर करतात. साधारणपणे हा सण लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. मात्र यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्याने ही पूजा मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे.
गोवर्धन पूजेच्या दिवशी भारतातील काही भागात शेणाचे पर्वत बनवून त्याची पूजा केली जाते. तसेच भगवान श्रीकृष्णाला अन्नकूट अर्पण केले जाते. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला ५६ भोग लावण्याला विशेष महत्व असते. एका पौराणिक कथेनुसार, भगवान इंद्राने रंगाच्या आणि अहंकाराच्या आहारी जाऊन वृंदावन नगरीत खूप जास्त पाऊस पडला. तेव्हा नगरवासींना आणि जनावरांना या पावसापासून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलून संपूर्ण वृंदावन नगरीतील रहिवास्यांना पावसापासून वाचविले होते. म्हणून आजच्या दिवशी गोवर्धन पर्वताचे प्रतीक म्हणून शेणाचे पर्वत बनवून त्याची पूजा केली जाते.
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी.