अभय नगर विकास समितीतर्फे 'दिवाळी पहाट'चे आयोजन

    13-Nov-2023
Total Views |

Soneri Pahat
 
नागपूर :
अभय नगर विकास समितीतर्फे यांनी दिवाळीनिमित्त ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता अभय नगर गार्डन येथे 'दिवाळी पहाट' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रशेखर सार्वे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. राम गुल्हाने व त्यांच्या चमुने कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास मानेकर, देवेंद्र धावडे, वासुदेव चावरे, विठोबा पिपरे, भास्कर निपाने, सुरेश भोयर, राजू जेटवा, अनिल मून, रमेश देवगडे, नितीन गवारकर, नितीन घोडेस्वार, अविनाश तांबे, सुयश पाटील, अमित भोयर, सुमन मिश्रा, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, अभय नगर, जंजाळ ले-आऊट, गजानन नगर, साई नगर, जयवंत नगर, महाराणा कॉलोनी, महात्मा फुले या वसाहत परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली.

तसेच याप्रसंगी देवेंद्र धावळे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर धाबरडे, दूनेस्वर लेपांडे, संतोष उम्रे आदींनी परिश्रम घेतले.