- दिग्गजांनी लावली उपस्थिती
नागपूर : कीर्ती फाऊंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त ‘दीप संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले. संध्यासमयी झालेल्या या कार्यक्रमात निरंजन बोबडे आणि सहकारी गायकांनी सादर केलेल्या सदाबहार हिंदी, मराठी गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध झाले. नरकेसरी लेआऊट, जयप्रकाश नगर, ‘आमराई ग्राऊंड’ येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर प्रा. अनिल सोले, संदीप जोशी, डॉ. विलास डांगरे, उद्योजक पराग खोत, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी दिनदयाल फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर धर्म आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सानिका धर्मे यांच्या नृत्याद्वारे सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. सुरुवातीला यश खेर यांनी सादर केलेल्या ‘सूर निरागस हो’ या गाण्याने रसिक तल्लीन झाले. यानंतर पार्वती नायर यांनी ‘पांडुरंग नामी’ हे गाणे अतिशय सुंदर सादर केले. अनघा किटकुले यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गीत प्रस्तुत केले. यानंतर निरंजन बोबडे यांनी ‘मन मंदिरा तेजाने’ सादर केलेल्या गाण्याला रसिक श्रोत्यांनी उत्तम दाद दिली. यानंतर माझे माहेर पंढरी, मधुबन में राधिका नाचे, आई भवानी, मल्हारवारी, राधा ही बावरी, निगाहे मिलाने को, जरासी आहट होती है, अश्विनी ये ना, एल मेरी जोहराजबी, लागा चुनरी मं दाग, कुहु कुहु बोले कोयलिया, अभी ना जाओ छोडकर, ऋतू हिरवा, लाजून हासणे अन् आदी एकापेक्षा एक हिंदी आणि मराठी गाण्यांनी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले. सुप्रसिद्ध गायक निरंजन बोबडे सर्व गायक कलाकारांनी अप्रतिम गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन आसावरी गलांडे यांनी, तर आभारप्रदर्शन कीर्ती फाऊंडेशनच्या रसिका नारळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पराग खोत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजन कीर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर धर्मे व सचिव विशाल महाजन यांनी केले आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.