मनपाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांच्यासह २९ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

    01-Nov-2023
Total Views |
 
nagpur-municipal-officials-retirement - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांच्यासह मनपातील विविध विभागांमध्ये कार्यरत २९ अधिकारी व कर्मचारी मंगळवारी मनपाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.
 
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात झालेल्या छोटेखानी समारंभात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वीणा मानकर, मुलगा क्षीतीज मानकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, रविंद्र भेलावे, सुरेश बगळे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, नगर रचनाकार प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता नरेंद्र बोरकर, रवींद्र बुधाडे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
कार्यकारी अभियंता अजय मानकर यांनी मनपात २६ वर्ष सेवा दिली असून, सुरुवातीच्या काळात ते केंद्र शासनात कार्यरत होते. यावेळी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मानकर यांच्याबद्दल गौरव उद्गार केले. तसेच त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेद्वारे विविध विकास कार्य केले असून, विशेषतः जी२० दरम्यान शहराला देशपातळीवर नेण्यास महत्वाचे सहकार्य केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. याशिवाय सर्व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भावनात्मक क्षण असल्याचे सांगत या सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपायुक्त रविद्र भेलावे यांनी मानकर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर मानकर यांनी आपल्या भावनात्मक उत्तरात सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.
 
तत्पूर्वी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे सर्व सेवानिवृत्तांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे निगम सचिव श्री. प्रफुल्ल फरकासे, स.प्र.वि.चे अधीक्षक श्याम कापसे, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी निगम सचिव प्रफुल्ल फरकासे यांच्या हस्ते मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, अग्निशमन विभाग, लकडगंज झोनचे सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी अनिल गोळे, आशीनगर झोनचे सहायक अधीक्षक अनिल कऱ्हाडे, जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता जगदीश जामोदकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उच्च श्रेणी लिपिक विष्णू खानोरकर, गांधीबाग झोन कर विभागाचे कनिष्ठ निरीक्षक दिलीप वाघुळकर, आरोग्य विभागाचे ऑलोपॅथिक कंपाउडर शेखर मालविया, नेहरूनगर झोनचे कनिष्ठ श्रेणी लिपिक संजय बावनकर, शिक्षण विभागाचे कनिष्ठ श्रेणी लिपिक दिलीप वाघ, समाज कल्याण विभागाचे मोहरीर माणिक शेवारे, कोंडवाडा विभागाचे कर संग्रहक हरी पेंदाम, पी.बी.एक्स. सिव्हील कार्यालय, कर आकारणी विभागाचे मोहरीर विकास गावंडे, मंगळवारी झोन कर आकारणी विभागाचे मोहरीर दिलीप मिश्रा, अति.आयुक्त (सामान्य) चे हवालदार सत्यनारायण गौतम, विद्युत विभागाचे हवालदार गोपाल हलबे, इंदिरा गांधी केंद्र रुग्णालयाचे ए.सी.जी. टेक्निशियन अल्का हुसेन ऊर्फ हेमचंद्र शेवाळे, शिक्षण विभागच्या सहायक शिक्षिका ज्योती मंडपीलवार, अर्चना तिवरखेड, जयश्री कडक, दिवाकर सातपूते, ज्योती कोहळे, वनिता कूहीटे, शारदा पमनानी, अजिजुन्नीसा बेगम अ. कादर खान, हॉट मिक्स प्लांट विभागाचे मजदूर अमरसिंग जरेरिया, जलप्रदाय विभागाचे मजदूर प्रकाश पारसे, उद्यान विभागाचे मजदूर पितांबर पटेल, फायलेरिया विभागाचे क्षेत्र कर्मचारी विठ्ठल खापकर, विकासमंत्री विभागाच्या चपराशी शमा सहारे यापैकी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.