मराठा आरक्षणबाबत राज्य शासन सकारात्मक, आंदोलकांनी शांतता राखावी; शंभूराज देसाईंचे आवाहन

    01-Nov-2023
Total Views |
 
maratha-reservation-government-response - Abhijeet Bharat
 
सातारा : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून आरक्षणाबाबत सर्व पक्षीय प्रमुखांची बैठक आज मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी मराठा बांधवानी कायदा व सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
 
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांनी सुरु केले उपोषण स्थगित करावे. त्याचबरोबर आपल्या तब्यतेची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले. मराठा आरक्षणबाबत आत्तापर्यंत शासनाकडून 26 बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजातील बांधवानींही शांतता पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही देसाई यांनी केले.