नागपूर कॉसकॉन २०२३ मध्ये अप्रतिम ॲनिमेचा सोहळा

    30-Oct-2023
Total Views |
 
nagpur-coscon-2023-anime-extravaganza - Abhijeet Bharat
 
नागपूर : कार्टून नेटवर्क या मुलांसाठीच्या लोकप्रिय मनोरंजन वाहिनीने या विकेंडला नागपुरात धमाल कार्यक्रमांसह नागपूर कॉसकॉन २०२३ मध्ये चाहत्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करत ॲनिमेची लोकप्रियता दणक्यात साजरी केली. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर कॉसकॉनमुळे नागपूर शहर म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या ॲनिमे सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरले. ॲनिमे कंटेंटमधील सर्वात मोठी वाहिनी असलेल्या कार्टून नेटवर्क ने विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी प्रेक्षक समुदायाशी हातमिळवणी केली होती. यातून औत्सुक्यपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात उत्साही ॲनिमेप्रेमींना आपले ज्ञान पडताळून पाहता आले आणि कार्टून नेटवर्क कडून आकर्षक बक्षिसेही जिंकता आली. शिवाय, उपस्थितांना आणि चाहत्यांना लोकप्रिय हिंदी व्हॉईस ॲक्टर अंकुर झवेरी आणि वैभव ठक्कर यांनाही भेटता आले.