- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केन्द्र आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) आयोजन
नागपूर : यंदाचे वर्ष हे ज्येष्ठ नाटककार, पत्रकार, माजी खासदार, विदर्भपुत्र स्व. विद्याधर गोखले यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. विद्याधर गोखले रचित गाजलेल्या नाट्य गीतांचा 'जय जय गौरीशंकर' हा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम शनिवार २८ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात होईल. यात पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, स्वरसम्राज्ञी, सुवर्णतुला या दर्जेदार संगीत नाटकांमधील लोकप्रिय नाटयगीते सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर आणि युवा गायक ऋषिकेश करमरकर हे नामवंत गायक गाणार असून संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तबल्यावर डॉ. राजेन्द्र डोळके साथ करणार आहेत.कार्यक्रमाचे निवेदन प्रा. विवेक अलोणी करणार आहेत. कार्यक्रमाला नाटय संगीतप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले आहे.