नागपूर : पत्रभेट दिवाळी अंक-2023 चा प्रकाशन सोहळा रविवार, 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पद्मभूषण विजय भटकर उपस्थित राहणार आहेत. जयप्रकाश नगर येथील गुरुमंदिरात रविवारी सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम आयोजिला आहे. प.पू. श्री सद्गुरुदास महाराज यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या अंकाचे प्रकाशन महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रभेटचे संपादक मंडळ व व्यवस्थापन मंडळाने केले आहे.