वाडी : वाडी नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव दत्तवाडीतील गजानन सोसायटीच्या क्रीडा मैदानावर रविवार २९ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपुर महानगर सहकार्यवाह दिनेश गौर तर प्रमुख पाहूणे म्हणून श्री संपनेश्वर सिद्ध शिवमंदीर समितीचे अध्यक्ष मोहन पाठक प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. वाडी नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाडी नगर संघचालक दिनेश मंत्री यांनी केले आहे.