अंजनगाव बारी : बडनेरा येथील रहिवासी मिलींद मुरलीधर लाड ( ४१, रा.बारीपुरा,जुनी वस्ती, बडनेरा) यांना दुचाकीवर आलेल्या अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली.
लाड हे घटनेच्यावेळी पेट्रोल पंपवरून घरी जात होते. तेव्हाच तीन दुचाकीवरून आलेल्या चार लोकांनी अंजनगाव बारी- राम मेधे अभियांत्रिकी पॉलिक्टेनीक कॉलेजजवळ अडविले आणि खाली पाडून बेदम मारहाण केली. हा हल्ला कश्यासाठी हे कळू शकले नाही, त्यांनी या अज्ञात हल्लेखोरांविरुध्द पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या अज्ञातांविरुध्द गुन्हे दाखल तपास आरंभिला आहे.