अमरावती : मानसीक आजाराला कंटाळून एका तरुणाने साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना भातकुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसरा गावात रविवार, 22 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली. निलेश किसन गुडधे (32, रा. आसरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात भातकुली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
निलेश गुडधे हा मजुरीचे काम करीत होता. परंतू सात ते आठ वर्षांपासून तो मानसिक आजारावर डॉ. लक्ष्मीकांत राठी यांच्याकडे उपचार घेत होता. निलेशला मानसिक त्रास असल्यामुळे त्याची पत्नी मुलाला घेऊन एक महिन्यापूर्वी माहेरी निघून गेली होती. दरम्यान त्याने 22 ऑक्टोंबर रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अशी माहिती निलेशच्या मोठ्या भावाने पोलिसांना दिली.