अमरावती : आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंर्तगत E-KYC करणे व आयुष्यमान कार्ड तयार करुन घेण्याकरीता कर्मचा-यांनी लाभार्थ्यांचे घरोघरी जाउन लक्षांक पूर्ण करणेबाबत लेखी सूचना अमरावती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांच्या मार्फत दिल्या आहे. पण हे काम अशैक्षणिक असुन शिक्षण विभागाचा याच्याशी कोणताही संबंध नाही. यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, म्हणून हे काम प्राथमिक शिक्षकांना देऊ नये अश्या प्रकारचे निवेदन सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा अमरावती यांनी बुधवार (25 ऑक्टोबर) रोजी अमरावती जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका प्रशासनाला दिले आहे.
१४ तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेची कामे ही गावातील पात्र लाभार्थ्यांची आयुष्यमान कार्ड ची नोंदणी १०० टक्के करण्याची लेखी आदेश दिलेले आहेत. याबाबत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, शासनाचे परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद केले आहे, की प्राथमिक शिक्षकांना त्यांचे कामाचे व्यतिरिक्त इतर योजनेचे कोणतेही कामे देण्यात येऊ नये. जर त्यांना त्यांची कामाची व्यतिरिक्त कामे दिल्यास त्यांच्या शैक्षणिक कामावर विपरीत परिणाम होईल. तरी राज्य शासनाच्या परिपत्रकाची अवलोकन करून प्राथमिक शिक्षकांना गावातील पात्र लाभार्थ्यांची आयुष्यमान कार्ड ची नोंदणीची कामे देण्यात येऊ नये, अन्यथा संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा इशारा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आहे.
निवेदन देताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शैलेन्द दहातोंडे, उमेश चुनकीकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र मेटे, राजकुमार खर्चान, उर्दू शिक्षक संघटनेचे वसिम फरहत, जावेद जोहर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे संतोष डोंगरे, अ.भा.शिक्षक संघाचे प्रविण शेंदरे, प्रफुल्ल ढोरे, गजानन निर्नळ, राजेश खोबरखेडे, शिक्षक सेनेचे सुधिर उमाळे, जुनी पेन्शन संघटनेचे गौरव काळे, म.रा.शिक्षक संघाचे सुनिल कुकडे, संजय बागडे, अपंग संघटनेचे राजु दिक्षित, किशोर मालोकार, उर्दू संघटनेचे इमरान खान पठाण, शिक्षक समितीचे अनिस शेख, संतोष राऊत, सतिश खंडारे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी दिले आहे.