वाडी : दत्तवाडीतील सदाचार सोसायटीमधील शीलादेवी शाळेसमोरील मैदानावर नवरात्री उत्सव निमीत्य न.प. वाडीच्या माजी सभापती कल्पना सगदेव व मैत्रीणी परिवार यांच्या पुढाकाराने रास गरबाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम उपस्थित महिलांनी देवीच्या प्रतिमेची पूजा व आरती केली.ज्योती खराबे यांनी दुर्गा देवीची भुमीका निभावून नाटयमय रित्या रास गरबा सादर केला. यावेळी वनमाला फुंडकर, वनश्री देशपांडे, माधुरी थेटे, प्रांजल कावरे , लक्ष्मी बैस, ज्योती भोरकर, सुनीता कळसकर, गीता ईखनकर, वर्षा शिंगरू, रज्जु गुजराथी, इंद्रायणी फटींग,वैशाली व्यास, भाग्यश्री पांडे, माधुरी तायवाडे, ईश्वर, निता चोपडे,सुजाता सुखदेवे,पौणीमा बंडावर,मिना ईखनकर उपस्थित होते.