क्रॉसफिट मल्टीस्टेशन जीमचे संदीप जोशी यांच्या हस्ते लोकार्पण

    24-Oct-2023
Total Views |
 
sandeep-joshi-inaugurates-fitness-station - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूर शहरातील बजाजनगर येथील नेहरू क्रीडा पार्क (बास्केटबॉल मैदान) येथे सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार क्रॉसफिट मल्टीस्टेशन जीम तसेच नवीन विद्युत पोलचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी कैलाशचंद्र अग्रवाल, डॉ. सुरेशचंद्र बत्रा, मनोज देशपांडे, जयंता आदमने, हेमा आदमने, दर्शन पांडे, आनंद माथनकर, विजय ताकवत, संध्या अढाळे, कविता देशमुख, शरद राठी यांच्यासह बजाज नगर नागरिक मंचचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
 
बजाज नगर येथील नेहरू क्रीडा पार्क (बास्केटबॉल मैदान) मध्ये ज्येष्ठ, तरुण तसेच अन्य नागरिकांच्या सुविधेसाठी क्रॉसफिट मल्टीस्टेशन जीमची व्यवस्था आणि प्रकाश व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची मागणी बजाज नगर नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देत संदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय मांडला व यादृष्टीने विशेष पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाकडे विशेष लक्ष देत मागणी पूर्णत्वास नेली व मैदानामध्ये क्रॉसफिट मल्टीस्टेशन जीमच्या व्यवस्थेचा मार्ग मोकळा केला. तसेच मैदानामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच सायंकाळी फिरायला येत असताना अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मैदानात नवीन विद्युत पोलची देखील व्यवस्था करण्यात आली.
 
मैदानामध्ये क्रॉसफिट मल्टीस्टेशन जीम आणि विद्युत पोलचे काम पूर्णत्वास येताच दोन्ही कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले व त्यानुसार सोमवारी लोकार्पण झाले. मागणीकडे विशेष लक्ष देउन ती पूर्ण केल्याबद्दल बजाज नगर येथील नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी महापौर संदीप जोशी यांचे आभार मानले.