नागपूर : भारतीय जनता पार्टी अनु जाती मोर्चा नागपूर शहर यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भोजन व्यवस्था व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रविण दटके, प्रदेश भाजपा प्रवक्ते तथा उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, संजय भेंडे, राष्ट्रीय अनु जाति मोर्चा उपाध्यक्ष अशोक मेंढे, आ. मिलिंद माने, संदीप जाधव, संदीप गवई, रामभाऊ अंबुल्कर, विष्णु चांगदे, दिलीप हातीबेड, उषाताई पायलट उपस्थित होते. या कार्यक्रमाला हजारो बुद्ध अनुयायी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर सरचिटणीस शंकर मेश्राम, इंद्रजित वासनिक, महेंद्र प्रधान, हिमांशु पारधी, अनंत जगनीत यानी प्रयत्न केले.