नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व महिला अध्यक्षा तसेच सध्याच्या नागपूर शहर मुख्य प्रवक्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेल्या नूतन रेवतकर या करत असलेल्या कामांची उत्तम भेट म्हणून पक्षातर्फे त्यांची महाराष्ट्र प्रदेश 'संघटन सचिव' या पदावर पदोन्नती देण्यात आली. नूतन रेवतकर यांची ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील साहेब यांनी केली.
नूतन रेवतकर यांची नियुक्ती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रयत्नाने झाली असून अनिल देशमुख त्यांच्याच हस्ते नूतन रेवतकर यांना हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यानिमित्ताने नूतन रेवतकर यांनी आपण करत असलेल्या कार्याची पक्षाने दखल घेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नागपूर शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे, युवानेते सलील देशमुख तसेच पक्षातील सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.