घर सजावटीची कल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असतात - आमदार अभिजित वंजारी

    23-Oct-2023
Total Views |
  • वाडीत पवन गृह सजावटीचे उदघाटन
home-decoration-ideas-by-mla-abhijit-vanjari - Abhijeet Bharat
 
वाडी : येथील खडगाव मार्गावरील पांडे लेआऊट मध्ये पवन गृह सजावटीचे उदघाटन आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे,माजी शिक्षण सभापती तथा जि.प. सदस्य भारतीताई अनिल पाटील, जि.प. सदस्य ममताताई धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश चोखांद्रे,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस अश्विन बैस , काँग्रेस कमिटीचे नागपूर जिल्हा महासचिव अनिल पाटील, माजी न.प. उपाध्यक्ष राजेश थोराने, कॉग्रेस कमिटीचे नागपूर तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडी शहर अध्यक्ष वसंतराव ईखनकर , देवराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
 
समकालीन गृहसजावट ही आजकाल प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. जी साध्या पण शोभिवंत आहेत. ही रचना आणि सजावट कल्पनांची यादी आहे जी भाडे कराराच्या अंतर्गत स्वयंपाकघरांसाठी देखील लवचिक आहेत. तुम्ही तुमची स्वतःची सर्जनशीलता जोडू शकता आणि या सर्व डिझाईन्सचे मिश्रण करू शकता. या गृहसजावटीच्या वस्तू प्रत्येक श्रेणीत येतात आणि प्रत्येक आकाराच्या घराला शोभतील. होम डेकोर आयटमच्या निवडी येथे आहे.घराच्या सजावटीची कल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असतात असे प्रतिपादन आमदार अभिजित वंजारी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कॉंग्रेस कमिटीचे वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने,शांताबाई नामदेव इखणकर,लक्ष्मी भगवान क्षीरसागर, नितेश क्षीरसागर , पवन क्षीरसागर यांनी केले. यावेळी ह.भ.प. प्रभाकर महाराज केदार, सुरेश ईखनकर, गोपाळ फुले, गणपत रागीट, अरुण कराळे, सदानंद सावरकर , योगेश कुमकुमवार, प्रमोद गिरीपूंजे, बाळकृष्ण लिचडे, अरुण बिडवाईक, अतुल देरकर, महेश चरडे आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते.