नागपूर :
नवरात्राच्या (Navratri 2023) सातव्या दिवशी देवी पार्वतीचे सातवे रूप भक्तांच्या जीवनातील अंधकार आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ओळखले जाते. देवी कालरात्री पवित्रता, देवत्व आणि अर्थातच स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. देवीचे नाव 'काल' म्हणजे मृत्यू आणि रात्रीसाठी 'रात्री' असे दोन भागात विभागलेले आहे.
हिंदू पौराणिक कथेनुसार, जेव्हा देवी पार्वतीने शुंभ-निशुंभाचा वध करण्यासाठी आपला सुवर्ण अवतार सोडला, तेव्हा तिला कालरात्री म्हणून संबोधले जाऊ लागले. चतुर्भुज असलेली देवी कालरात्रीचे वाहन गाढव आहे. आपल्या चार हातांपैकी एका हातात खडग, एका हात लोखंडी काटा असून एक हाथ अभयमुद्रेत तर एक हाथ वारद मुद्रेत आहे.
कालरात्रीला भाविक देवीला कुमकुम, लाल फूल आणि गूळ अर्पण करतात. तसेच लिंबाची माळही अर्पण केली जाते. असे मानले जाते की देवी कालरात्री आपल्या भक्तांना निर्भयता आणि धैर्य प्रदान करते. सर्व वाईट आत्म्यांचा नाश करणारा देवीचा हा रूप जितका रौद्र आहे तितकाच शुभ सुद्धा आहे.