वाडी :
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतंर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजनेचा आढावा तसेच नवीन शासकीय स्वस्त धान्य दुकान इतर ठिकाणी सुरु करण्याच्या पाहणी करीता नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदर्श नगरमधील राकेश बारापात्रे यांच्या स्वस्त धान्य दुकानाला शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० अचानकपणे भेट दिली.
वाडीत जिल्हाधिकारी आल्याची कल्पना नसल्यामुळे वाडीतील कोणतेही शासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल नव्हते. जिल्हाधिकारी यांच्या सोबत इंदिरा गांधी रुग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सक्सेना प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता उराडे, भाजपा ओबीसीचे जिल्हा महामंत्री केशव बांदरे उपस्थित होते.