घरीच करा; झणझणीत तिखट शेजवान चटणी, वाचा कृती

    04-Jan-2023
Total Views |
shejwan chatani
image source internet
 
नागपूर:
घर तिखट आणि चमचमीत खाण्याची आवड असल्यामुळे अनेकदा आपण बाजारातून शेजवान चटणी (schezwan chutney) खरेदी करून आणतो, पण ही झणझणीत शेजवान चटणी (schezwan chutney) आपण घरबसल्या बनवू शकतो, ते कशी चला तर जाणून घेऊ या..
झणझणीत शेजवान चटणी घरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, १0-१२ सुकलेल्या लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, एक कांदा , दोन आलं, दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि तेल.

अशी करा शेजवान चटणी कृती

प्रथम लसूण सोलून लाल मिरच्या बरोबर शिजत ठेवा. चांगला शिजल्यावर पाणी काढा, मात्र टाकून देऊ नका. मिक्सरमध्ये शिजलेल्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट करुन घ्या. कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण, आलं, हिरव्या मिरच्याचे तुकडे परतून घ्या. चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परता. चमचाभर काश्मिरी मिरची पूड घालू शकता. यात गाळलेलं पाणी मिसळा. लसूण, मिरचीची पेस्ट घालून मिर्शण पाच मिनिटे शिजवून घ्या. उकळी आल्यावर चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालून पुन्हा दोन मिनिटे शिजवा. पूर्ण गार झाल्यावर ही चटणी हवाबंद बरणीत भरून ठेवा. शेजवान चटणी तयार