उपवास स्पेशल रेसिपी: रताळ्यापासून बनवा 'हा' चमचमीत तिखट पदार्थ

    30-Jan-2023
Total Views |

fast special sweet potato tikki recipe (Image Source : Internet)
 
 
नागपूर:
हिवाळ्यात बाजारात बरेच हंगामी फळे आणि भाज्या आपल्याला दिसतात. त्यातीलच एक आहे रताळं. रताळं हे एक असे पदार्थ आहे जयने सहसा गोड पदार्थच बनविले जातात. रताळ्याचा समावेश मूळ भाज्यांमध्ये होतो. हिवाळ्यात रताळे खाण्याचे अनेक फायदे शरीराला होत असतात. रताळ्याच्या भरपूर प्रमाणात फायबर असते. उपवासात बऱ्याचदा हेवी डाईट मुळे बऱ्याचदा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. अश्यात रताळ्यातील फायबर शरीरातील मेटॅबोलिसम गतिमान करतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो. चला तर जाणून घेऊया रताळ्याच्या या खास पदार्थाला नेमके कसे बनवावे.
 
रताळ्याची टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे:
 
साहित्य :
उकळलेले रताळे - मध्यम आकाराचे २
उकळलेले बटाटे- मध्यम आकाराचे २
आल्याचे पेस्ट - १ छोटा चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर - १ चमचा
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २
मिरी पावडर - चिमूटभर
जिरे पावडर - अर्धा चमचा
सेंधव मीठ - अर्धा चमचा
तिखट - आवश्यकतेनुसार 
तेल- तळण्यासाठी 
 
कृती :
सर्वप्रथम उकळलेले रताळ आणि बटाट्याचे साल काढून घ्या. आता एका बाऊलमध्ये मॅश करून घ्या. यामध्ये सेंधव मीठ, जिरे पावडर, मिरी पावडर, आल्याचे पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व चांगल्याप्रकारे एकत्र करून घ्या. आता यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट घाला. आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला टिक्कीचा आकार द्या. आता गॅस वर एक पॅन ठेऊन त्यात तेल घाला. तेल गरम झाले की त्यामध्ये एक एक करून टिक्की घाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या टिक्कीला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करू शकता. एका बाजूने टिक्की हलकी तपकिरी झाली की चमच्याने पलटून घ्या. दोन्ही बाजूने टिक्की हलकी तपकिरी रंगाची झाली की ते एका प्लेटमध्ये काढून घ्या.  तयार आहे चविष्ट रताळ्याची टिक्की. टिक्कीचा आस्वाद घेताना तुम्ही याबरोबर दही देखील सर्व करू शकता. 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.