ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा; काय आहे कारण?

    07-Jul-2022
Total Views |

uk pm boris johnson
(Image Source : Internet)
 
 
लंडन :
ब्रिटनमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे. अनेक स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली आहे. बोरिस जॉन्सन यांनी सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी नव्या नावाची घोषणा होईपर्यंत बोरिस जॉन्सनच ही जबाबदारी सांभाळणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः ते पायउतार होत असल्याचे पुष्टी केली आहे. तसेच त्यांच्या हुजूर पक्ष आता नवीन नेता आणि पंतप्रधान निवडणार आहे. याबाबत बोलताना बोरिस जॉन्सन म्हणाले की, 'मला माझ्या कामगिरीचा प्रचंड अभिमान आहे, जोपर्यंत नवीन नेता येत नाही तोपर्यंत मी काम करत राहीन.'
 
 
 
 
खरे सांगायचे झाले तर, हुजूर पक्षात सध्या बंड सुरु आहे. बोरिस जॉन्सन हे चार प्रमुख मंत्र्यांचे राजीनामे आणि त्यांच्याच सरकारमधील खासदारांनी बंड केल्यानंतरही ब्रिटनमधील सत्ता सोडणार नाही, यावर ठाम होते. मात्र एका वृत्तसंस्थेनुसार ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत ५० हून अधिक मंत्र्यांनी सरकार सोडले आहे. त्यामुळे नाईलाजाने बोरिस जॉन्सन यांना आपला निर्णय बदलत राजीनामा द्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता ब्रिटनमध्ये मोठे राजकीय संकट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.