आज वटसावित्री! उपवासासाठी बनवा कच्च्या केळाचे दहीवडे

    14-Jun-2022
Total Views |

dahi vada (Image Source : Internet)
 
 
कच्च्या केळाचे दहीवडे 
 
 
साहित्य :
 
एक डझन कच्ची केळी
पाऊण वाटी वरीचे पीठ,
शिंगाड्याचे पीठ,
राजगिऱ्याचे पीठ,
अर्धी वाटी दाण्याचे कूट,
१०-१२ हिरव्या मिरच्या,
खायचा सोडा,
साखर,
जिऱ्याची पूड,
मीठ,
कोथिंबीर,
तीन वाट्या दही
 
 
कृती :
 
केळी सोलून कुकरमध्ये उकळून घ्यावी. थंड झाल्यावर वाटून घ्यावी. त्यात जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ व वाटून घेतलेल्या मिरच्या घालाव्या. या मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्यावेत. वरी, शिंगाडा आणि राजगिऱ्याचे पीठ पाण्यात कालवून पातळ करावे. तयार केलेले वडे या पिठातून बुडवून तेलात तळून घ्यावे. तळलेले वडे पाण्यात घालून बाहेर काढून हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून घ्यावे. दही थोडे फेटून घेऊन त्यात वाटलेले आलं, साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार केलेले वडे या दह्यात सोडावेत. खायला देताना थोडं लाल तिखट वर भुरभुरावं.