अशी बनवा खमंग मटारची उसळ

    14-Jun-2022
Total Views |

matar
(Image Source : Internet) 
 
 
मटारची उसळ 
 
 
साहित्य :
१० वाट्या सोललेला मटार,
२ वाट्या ओलं खोबरं,
दीड वाटी चिरलेली कोथिंबीर,
मध्यम तिखटाच्या ८-१० मिरच्या (लाल तिखट घालणार असल्यास मिरच्या निम्म्या घ्याव्यात),
१ चमचे आल्याचा ठेचा,
अर्धा चमचा लसूण वाटण,
अर्धी वाटी तेल,
मीठ,
फोडणीचे साहित्य : १ चमचा जिरे, अर्धे लिंबू, १०-१२ कढीलिंबाची पाने.
 
कृती :  
 
उकळत्या पाण्यात मटार दाणे चिमूटभर सोडा टाकून शिजवून घ्यावेत. ते पाणी काढून टाकावे. खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, जिरे, मीठ, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावे. फोडणीत कढीलिंब टाकून त्यावर वाटलेला गोळा परतावा. त्यावर शिजवलेला मटार घालून त्यावर ५-६ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी येताना आवडत असल्यास लिंबाचा रस घालावा.