गाजर गुलाबजाम : करून बघा 'हे' वेगळ्या प्रकारचे गुलाबजामून

    14-Jun-2022
Total Views |
 
 
gulabjam
 (Image Source : Internet)
 
 
गाजर गुलाबजाम
 
 
साहित्य :
 
अर्धा किलो गाजर,
अर्धा किलो खवा,
८ चमचे कॉर्नफ्लोअर,
अर्धा किलो साखर,
अडीच कप पाणी,
१ चमचा वेलची पूड,
२ चमचे बारीक रवा, तळण्याकरिता तूप किंवा तेल.
 
कृती :
 
गाजर सोलून किसून घ्यावी आणि कुकरमध्ये शिट्टी न लावता १० मिनिटे शिजवून घ्यावी. शिजलेल्या किसातून पाणी काढून टाकावे. किसामध्ये खवा आणि कॉर्नफ्लोअर घालून चांगले मळून एकजीव करावे. या मिश्रणाचे एकसारख्या आकाराचे गोळे करून मंद आचेवर तुपात किंवा तेलात तळून घ्यावे. साखरेचा पाक करून त्यात वेलचीपूड घालून त्यामध्ये तळलेले गुलाबजामून टाकून पाकाला एक उकळी आणावी. दिसायला अतिशय सुंदर, पौष्टिक असे हे गुलाबजामून आहेत. गाजर नसेल तर दुधीभोपळा, मटार, कॉर्न वापरले तरी चालेल.